top of page

सर्वात विलक्षण प्रवास-विमा संरक्षण- ज्याबद्दल कदाचित आपण अनभिज्ञ असाल.

  • Writer: Travel Insurance Info
    Travel Insurance Info
  • Mar 31, 2024
  • 2 min read

तुम्ही आम्हाला (तुमच्या मते) प्रवास तज्ञ/सल्लगार म्हणून विचारात असाल तर प्रवास विमा ही व्हिसा नंतरची अत्यंत कठीण प्रवास औपचारिकता आहे असे आम्हाला वाटते. यामध्ये खूप अटी आणि नियम आहेत.यामधे बऱ्याच गोष्टी प्रवाश्यांच्या गरजांवर आधारित आहेत त्यानुसार त्या समाविष्ट करणे आवश्यक आहे.प्रवासाच्या इतर औपचारिकतेच्या तुलनेत ही प्रक्रिया खूप जलद असली तरी ती अजूनही गुंतागुंतीची आहे. तुमच्या एका चुकीमुळे प्रवासादरम्यान मोठ्या समस्या आणि मोठा खर्च उद्भवू शकतो.


तुम्ही देशाबाहेर किमान एकदा जरी प्रवास केला असेल तर तुम्हाला नेहमीच्या प्रवास-विमा संरक्षणाबद्दल माहिती असेलच.यामधे प्रवास रद्द करणे आणि प्रवासाला व्यत्यय येणे किंवा विलंब होणे, वैद्यकीय खर्च, हरवलेले किंवा चोरी झालेले सामान, वैयक्तिक जबाबदारी, प्रवास दस्तऐवजांचे नुकसान अशा बाबी आहेत.


त्याचप्रमाणे, इतर सामान्य अतिरिक्त प्रवास संरक्षण आहेत ज्याची विचारणा हि सामान्य संरक्षणा व्यतिरिक्त केली जाऊ शकते. जसे साहसी किंवा धाडसी क्रीडा प्रकारांसाठी संरक्षण, आधीपासूनच अस्तित्वात असलेली वैद्यकीय परिस्थिती, कोणत्याही कारणास्तव संरक्षण रद्द करणे, जास्त किमंत असलेल्या वस्तूंसाठी संरक्षण.


जिज्ञासू वृत्तीच्या प्रवाशांसाठी आम्ही सर्वात परिणामकारक प्रवास विमा संरक्षण उपलब्ध करून देत आहोत, खरे सांगायचे तर याबद्दल अगोदर आम्हाला सुद्धा माहिती नव्हती.


झोम्बी सर्वनाश घटना:  काही प्रवासी विमा योजनांमध्ये झोम्बी सर्वनाश घटना किंवा इतर आपत्तीजनक घटनांमुळे प्रवास रद्द होणे किंवा त्यात व्यत्यय येणे अशा गोष्टींना संरक्षण देण्याची शक्यता फारच कमी आहे.  तथापि, विशिष्ट अटी आणि शर्ती या वेगवेगळ्या असू शकतात. हे संरक्षण मुख्यतः कठीण किंवा अत्यंत टोकाच्या परिस्थितींसाठी आहे.


पाळीव प्राण्याशी संबंधित समस्या: काही योजना तुमच्या पाळीव प्राण्याशी संबंधित अनपेक्षित खर्चांसाठी संरक्षण देतात.  प्रवासादरम्यान  पाळीव प्राणी आजारी पडल्यास अथवा तुमच्या परतीच्या प्रवासास आपत्कालीन परिस्थितीमुळे उशीर झाला असेल तर अशावेळी पाळीव प्राण्यांना सांभाळण्याचे शुल्क तुम्हाला दिले जाते.


विदेशी अपहरण: विदेशी अपहरणांना संरक्षित करणार्‍या विमा योजनांसंदर्भात काही अहवाल/बातम्या उपलब्ध आहेत. अशा प्रकरणांमध्ये, योजनाधारक अशा विलक्षण घटनेचा पुरावा देऊ शकत असल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते.


भितिदायक निवासस्थान: तुम्हाला असामान्य क्रियाकलाप आढळल्यास किंवा झपाटलेल्या भितिदायक गोष्टींच्या तुमच्या दाव्यांमुळे निवासस्थानात राहण्यास सक्षम नसल्यास अशावेळी काही धोरणे अतिरिक्त निवास खर्चाची परतफेड तुम्हाला मिळवून देऊ शकतात.

Recent Posts

See All
प्रवास-विमा खरेदी करण्याची चेकलिस्ट (Checklist for Buying Travel Insurance)

प्रवास विमा खरेदी करताना अनेकदा आपण गोंधळून जातो. बाजारात अनेक प्रकारच्या योजना उपलब्ध असतात आणि प्रत्येक योजनेच्या वेगवेगळ्या अटी आणि...

 
 
 

Comentários


bottom of page