तुम्ही प्रवासाचे नियोजन करताना प्रवास-विमा तुमच्यासाठी कशाप्रकारे संरक्षण मिळवून देतो याबाबद्दलची बरीच माहिती तुम्हाला दिली जाते.विशेषत: एक आंतरराष्ट्रीय प्रवासी म्हणून तुम्हाला हे माहिती असणे आवश्यक आहे कि कोणत्या गोष्टींचा समवेश तुमच्या प्रवास विम्यामध्ये नाहीये.
तुम्ही कठीण परिस्थितीसाठी तेव्हाच तयार होऊ शकता जेव्हा तुम्ही हे जाणून असाल की तुम्हाला परदेशात कोणाच्याही मदतीशिवाय या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. आता हे समजल्याने बिलकुल घाबरून जाऊ नका, कारण तुम्हाला माहीतच असेल की प्रवास विमा रुग्णालयात दाखल करावे लागणे किंवा वैद्यकीय आणीबाणीसारख्या प्रमुख गोष्टींना संरक्षण मिळवून देतो.
मृत्यू, अपघात, सामानाचे नुकसान, प्रवासाला विलंब होणे अथवा तो रद्द करणे अशा घटनांमुळे तुम्हाला खिशातून पदरमोड करून होणाऱ्या खर्चाच्या नुकसान पासून प्रवास विमा तुम्हाला वाचवतो.
या ठिकाणी आम्ही तुम्हाला माहिती करून देऊ की प्रवास-विमा मध्ये कोणत्या बाबी समाविष्ट नाहीयेत.
पूर्व-अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय अटी: जोपर्यंत तुम्ही विशिष्ट आवश्यकता पूर्ण करत नाहीत अथवा पूर्व-अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय अटींना संरक्षण मिळवून देणारी योजना खरेदी करत नाहीत तोपर्यंत अनेक प्रवासी विमा योजनांमध्ये तुम्ही योजना खरेदी करण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या पूर्व-अस्तित्वातील वैद्यकीय परिस्थितींचे संरक्षण हे वगळले गेले आहे. यामधे मधुमेह, हृदय रोग आणि अस्थमा यांसारख्या आजारांपासून ते अगोदरच झालेल्या शस्त्रक्रिया किंवा जखमांपर्यंतच्या विविध अटींचा समावेश असू शकतो. विमा उतरवण्यापूर्वीच ही आजार अस्तित्त्वात असल्यामुळे यामुळे विमा कंपन्यांना जास्त जोखीम निर्माण होते. परिणामी, अनेक मानक प्रवास विमा योजनांमध्ये पूर्व-अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय परिस्थितीशी संबंधित खर्चासाठी सुरक्षा वगळली जाते. याचा अर्थ असा होतो की जर तुम्हाला प्रवास करताना एखादी वैद्यकीय तत्काळ परिस्थिती उदभवली असेल जिचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पूर्व-अस्तित्वात असलेल्या स्थितीशी संबंध असेल, तर काही अटींची पूर्तता केल्याशिवाय तुमच्याकडे असणारा विमा येणाऱ्या संबंधित खर्चाला संरक्षण मिळवून नाही देवू शकणार.
जास्त जोखमीच्या क्रिया: धाडसी खेळ, साहसी क्रिया आणि बंजी जंपिंग, स्कायडायव्हिंग किंवा गिर्यारोहण यांसारखे काही धोकादायक उपक्रम अशा क्रियाकलापांसाठी तुम्ही अतिरिक्त संरक्षण खरेदी केल्याशिवाय तुम्हाला सुरक्षित केले जाऊ शकत नाहीत. बर्याच प्रमाणित प्रवास विमा योजना या जर प्रवासी जास्त जोखमीच्या क्रियांमध्ये भाग घेत असतील आणि त्यांना दुखापत झाली किंवा त्यांचा अपघात झाला असेल तर अशावेळी या कंपन्या तुमचे संरक्षण वगळतात. याचा अर्थ असा आहे की या साहसी खेळांमध्ये जर तुम्ही गुंतलात आणि जखमी झालात तर तुमचे वैद्यकीय खर्च आणि इतर संबंधित खर्च तुमच्या नियमित योजनेमध्ये संरक्षित केले जाऊ शकत नाहीत. काही विमा प्रदाते विशेषत: जास्त जोखीम असलेल्या क्रियाकलापांसाठी अतिरिक्त विमा संरक्षण खरेदी करण्याचा पर्याय देतात. यालाच "राइडर" किंवा "एड-ऑन" म्हणून संबोधले जाऊ शकते. जर तुम्ही ठरवले असेल की तुम्ही तुमच्या प्रवासादरम्यान अशा क्रियाकलापांमध्ये तुम्ही सहभागी होणार आहात, तर तुम्ही या उपक्रमांचा समावेश करण्यासाठी तुमच्या विमा सुरक्षेसाठी अतिरिक्त हप्ता भरू शकता.
जाणूनबुजून हेतुपूर्वक केलेली कृत्ये: जर तुम्ही विचार न करता किंवा हेतुपूर्वक वर्तन करत असाल आणि दावा दाखल करत असाल तर अशावेळी तुमचे विमा संरक्षण नाकारले जाऊ शकते. यामध्ये बेकायदेशीर गोष्टींचा किंवा स्वत: ला झालेल्या दुखापतींमुळे घडलेल्या घटनांचा समावेश होतो. प्रवास विम्याचे संरक्षण मिळवण्यासाठी हेतुपुरस्सर कृत्ये करून दावे दाखल केले जातात अशांना अनेकदा अनपेक्षितपणे घडलेल्या अपघात किंवा घटनांपेक्षा वेगळ्या पद्धतीने वागणूक दिली जाते. विमा कंपन्यांच्या योजनांमध्ये सामान्यत: अशा तरतुदी असतात ज्यात हेतुपुरस्सर, बेपर्वा किंवा बेकायदेशीर वर्तनामुळे उद्भवणाऱ्या घटनांसाठी विमा सरंक्षण हे वगळले जाते. प्रवास विमा योजनांमध्ये सामान्यत: अशी कलमे समाविष्ट असतात जी स्पष्टपणे नमूद करतात की जाणूनबुजून केलेल्या कृत्यांमुळे होणाऱ्या दाव्यांसाठी विमा सुरक्षा नाकारली जाईल. योजनाधारक व्यक्ती जाणूनबुजून आणि मुद्दाम अशा प्रकारचे वर्तणूक करतो आणि विमा संरक्षणासाठी दावे दाखल करतो अशा परिस्थितींचा यामध्ये समावेश होतो.
मद्यपान आणि नशादायी औषधे (ड्रग्ज) यांचे सेवन - अतिप्रमाणात मद्यसेवन करणे किंवा नशादायी औषधांचा (ड्रग्ज) सेवनामुळे अपघात किंवा जखमांमुळे उद्भवणारे संबंधित घटनांचे दावे विमा संरक्षणातून वगळले जाऊ शकतात. मद्यपान आणि नशादायी औषधे (ड्रग्ज) संबंधित घटना यामुळे अशी परिस्थिती उद्धभते ज्यामध्ये प्रवाश्याने मद्यपान किंवा नशादायी औषधे (ड्रग्ज) सेवन केल्यामुळे अपघात, दुखापत किंवा इतर घटना घडतात .अशा परिस्थितीमध्ये वैद्यकीय उपचार किंवा इतर प्रकारच्या मदतीची तुम्हाला गरज भासू शकते.म्हणून विमा प्रदाते हे या सगळ्या जोखिमा आणि प्रवाश्याने विचार न करता केलेली कृत्ये लक्षात घेऊन याबाबतचा उल्लेख योजनेच्या अटींच्या कागदपत्रांमध्ये अगोदरच करत असतात.
मानसिक आरोग्याची अवस्था: काही योजना या मानसिक आरोग्य-संबंधित समस्यांसाठी विमा संरक्षण वगळू शकतात. जसे की चिंता, नैराश्य, द्विधा मनस्थितीचे विकार आणि तणाव-संबंधित परिस्थितींमुळे दाखल केले जाणारे दावे. अशा बाबींमुळे एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या आरोग्यावर आणि कार्यपद्धतीवर परिणाम होऊ शकतो आणि याचाच थेट परिणाम प्रवासाच्या योजनांवरही होऊ शकेल. म्हणूनच प्रवास विमा योजना या परिस्थितीमध्ये विमा संरक्षण देत नाहीत. काही योजनांमध्ये मानसिक आरोग्याच्या परिस्थितीशी संबंधित विशिष्ट तरतुदी केलेल्या असू शकतात आणि त्यांचे विमा संरक्षण त्यानुसार बदलू शकते.
नागरी अशांतता आणि राजकीय अस्थिरता: नागरी अशांतता, राजकीय अस्थिरता किंवा युद्धाच्या कृत्यांमुळे प्रवास रद्द होणे किंवा त्यात व्यत्यय येणे अशा घटनांना प्रवास विम्यामध्ये संरक्षण नाही मिळू शकत. या घटनांना अनेकदा "तातडीचे प्रसंग" म्हटले जाते. नागरी अशांतता आणि राजकीय अस्थिरता म्हणजे अशी परिस्थिती जिथे एखादा प्रदेश किंवा देश अशांतता, निषेध, निदर्शने, संप किंवा सामाजिक आणि राजकीय उलथापालथीचे इतर प्रकार अनुभवत असतो. या घटनांमुळे प्रवाशांसाठी प्रवासादरम्यान अनिश्चितता असणे, व्यत्यय येणे आणि संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात.या घटनांच्या अप्रत्याशित स्वरूपामुळे आणि प्रवासाच्या योजनांसमोर ते निर्माण करतील अशा आव्हानांमुळे प्रवास विमा योजनांमध्ये अनेकदा अशा घटनांशी संबंधित तरतुदी केलेल्या असतात.
मनातील विचार बदलल्यामुळे प्रवास रद्द करणे: जर तुम्ही प्रवासाबाबत तुमचा विचार बदलला आणि तुमचा प्रवास रद्द करणार असाल तर हा बाह्य परिस्थितीशी संबंधित नसलेला तुमचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. जसे की पुढील प्रवास योजना तुम्हाला दिलेल्या पर्यायांसोबत जुळत नसेल अथवा तुमच्या प्राधान्यक्रमातील गोष्टी बदलत असतील तर अशावेळी बहुतेक प्रवास विमा योजना तुम्हाला विमा संरक्षण प्रदान करणार नाहीत.
विशेषतः प्रवास रद्दीकरण विमा सुरक्षेसाठी विशिष्ट कारणे देणे आवश्यक असतात- जसे की आजारपण किंवा अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटना.
हे लक्षात असुद्या की विमा योजना आणि विमा प्रदाते यानुसार विमा योजनेतील अपवाद असलेल्या अटी बदलू शकतात. विमा योजना दस्तऐवज पूर्णपणे वाचणे आणि यामध्ये काय समाविष्ट आहे आणि काय नाही यासह अटी आणि शर्ती समजून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला विमा सुरक्षेबद्दल काही विशिष्ट शंका असतील तर, स्पष्टीकरणासाठी तुम्ही थेट विमा प्रदात्याशी संपर्क साधू शकता किंवा विमा व्यावसायिकाकडून सल्ला घेऊ शकता. सर्व परिस्थितींसाठी तुम्हाला सुरक्षा प्रदान करणारा प्रवास विमा मिळवणे जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट आहे.
बर्याच प्रवास-विमा योजना या काही विशिष्ट परिस्थितींसाठी संरक्षण प्रदान करतात ज्या सामान्यत: अतिरिक्त खर्च करून भरलेल्या हप्त्याने सुद्धा संरक्षित केल्या जात नाहीत. अचूक संशोधन करून योग्य प्रवास विमा खरेदी करा आणि तुमच्या प्रवासादरम्यान नियोजित केलेल्या विविध क्रियाकलापांच्या आधारे तुम्हाला अतिरिक्तरित्या आवश्यक असलेले योग्य ते विमा संरक्षण तुम्ही खरेदी करत असल्याची खात्री करा.
आता प्रवास विम्याबाबत आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती झाली आहे त्यामुळे यामधील एक योग्य निवड करण्यास आता तुम्ही सक्षम झाले आहात.
Comments