top of page

प्रवास-विमा: सकारात्मक आणि नकारात्मक बाबी

  • Writer: Team travel insurance info
    Team travel insurance info
  • Apr 16, 2024
  • 2 min read

देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करत असताना स्वतःच्या आरोग्याच्या काळजीकरता पैसे खर्च करण्यासाठी आपण सगळ्यात शेवटी प्राधान्य देतो.वैद्यकीय आणीबाणी, शस्त्रक्रिया आणि दुखापती अशा संबंधित अनपेक्षित खर्चापासून प्रवास विमा तुमचे संरक्षण करतो. आपण निवडत असलेल्या योजनेनुसार चोवीस तास काळजी घेण्यासाठी आणि सेवेसाठी तुम्ही पात्र असाल. यामध्ये तुमच्या झालेल्या खर्चाची परतफेड हि जवळच्या वैद्यकीय सुविधा केंद्रामध्ये जमा होईल. प्रवासात किंवा विमान प्रवासादरम्यान तपासलेले सामान चुकीच्या ठिकाणी ठेवले जाणे, ते चोरीला जाणे किंवा चुकीच्या पद्धतीने त्याची हाताळणी होणे या घटना नेहमीच घडत असतात. जर तुम्ही प्रवास-विमा खरेदी केला नसेल  तर तुम्ही सामानावर खर्च केलेले पैसे तसेच तुमच्या प्रवास बॅगेतील मौल्यवान वस्तू याना गमावून बसाल.तुम्हाला तुमच्या पैशाची परतफेड मिळेल की तुमच्या हरवलेल्या सामनाच्या बदल्यात बदली मिळेल हे तुम्ही निवडलेल्या प्रवास विमा योजनेवर अवलंबून असणार आहे. प्रवास रद्द करणे: तांत्रिक अडचणी किंवा खराब हवामान असेल तर अशा कारणांमुळे प्रवास रद्द होणे आवश्यक असू शकेल. तुम्ही अगोदरच हॉटेल आणि प्रवास आरक्षणांमध्ये गुंतवलेले पैसे देखील गमावाल आणि तुमचा पदरी निराशा पडेल.पण अशा वेळी प्रवास विमा रद्दीकरण सुरक्षा योजना  तुमच्या संपूर्ण गुंतवणुकीची परतफेड तुम्हाला करून देऊ शकेल.


याठिकाणी काही तोटे सुद्धा आहेत.


• प्रवास-विमा हा तुलनेने महाग असू शकतो.

• यामधे पूर्व-अस्तित्वात असलेल्या परिस्थितींचा समावेश होत नाही.

• प्रवास विमा योजनांमध्ये सर्व गुंतागुंतीच्या अटी/शर्ती असतात. तुमचा काहीवेळा झालेला खर्च कारण नसतानाही नाकारला जातो.

• प्रवास विमा योजनेमधून महत्वाच्या गोष्टीलाच वगळणे हे काही व्यक्तींसाठी चिंतेचे कारण बनू शकते. अनेक विमा प्रदाते प्रवास विम्याशी संबंधित उत्पादने निर्माण करत असतात.

• बहुदा अनेकवेळा यात्रा कंपनी याच प्रवास विमा ग्राहकांना देत असतात पण अनेकांना असे वाटते की विमा संरक्षण आणि खर्च याची तुलना करून दुसरीकडून ते खरेदी करणे फायद्याचे आहे.

जरी या प्रकारचे विमा करार हे दीर्घव्यापी असले तरी तुम्हाला विम्यामध्ये काय संरक्षित आहे आणि काय नाही याची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

प्रवास विम्याचे काही तोटे असल्याने ते खरेदी करताना सुरुवातीला तुम्हाला निराशा वाटू शकेल -

• प्रवास विम्याच्या खर्चाव्यतिरिक्त त्यानंतरची प्रक्रिया ही एकापेक्षा जास्त प्रवाश्यांशी संबंधित आहे.


खालील दिलेल्या गोष्टींना कदाचित सुरक्षा नाही मिळू शकणार:


• अ. स्वतःच्या विचारात बदल झाल्यामुळे

• ब. युद्धजन्य परिस्थिती

• क. आरोग्याची पूर्व परिस्थिती

• ड. रीतिरिवाजांमुळे होणारे नुकसान

• ई. स्वतः कारणीभूत असलेले आजार


तातडीच्या परिस्थितीमुळे तुम्हाला खाजगी विमान किंवा हेलिकॉप्टरने नाईलाजास्तव देश सोडून बाहेर जात असाल तर अशावेळी खर्चाची  परतफेड तुम्हाला मिळण्याची शक्यता नाही. तथापि, दहशतवादी कृत्यांसाठी प्रवास रद्द झाला तर  काही पर्यायी विमा योजना यासाठी सुरक्षा  प्रदान करतात.


बहुसंख्य प्रवास विमा योजनांमध्ये  पूर्व-अस्तित्वात असलेल्या परिस्थितींना  सुरक्षा दिली जात नाही.असे असले  तरीही काही विमा प्रदाते अटींसह अपवादात्मक बाबींचा समावेश यामधे करू शकतात.

उदाहरणार्थ, योजनाधारकाने विशिष्ट कालावधीसाठी लक्षणे-मुक्त स्थिती राखणे आवश्यक ठरेल अशी अट.

 
 
 

Recent Posts

See All
प्रवास-विमा: एक झलक (Travel Insurance: An Overview)

प्रवास म्हणजे स्वप्नपूर्ती, नवीन ठिकाणांचा शोध आणि आनंदाचे क्षण. पण कधी कधी अनपेक्षित घटना घडू शकतात - विमान उड्डाण रद्द होणे, सामान...

 
 
 
प्रवास-विमा: तुमच्या सहलीचा सुरक्षा कवच (Travel Insurance: A Safety Net for Your Trip)

आपण प्रवास करताना आपल्याला सुरक्षितता आणि मनाची शांती हवी असते. आपण कधीही अपघात, आजारपण किंवा इतर अनपेक्षित घटनांचा सामना करू शकतो. अशा...

 
 
 

Comments


bottom of page