top of page

प्रवास-विमा फायद्या बद्दल आणि अनपेक्षित परिस्थितीत ते कसे मदत करू शकतात या बद्दल आपण जाणून घेऊयात.

  • Writer: Team travel insurance info
    Team travel insurance info
  • Mar 26, 2024
  • 2 min read

प्रवास करणे हा एक उत्साह देणारा अनुभव आहे,परंतु हा अनुभव तुम्हाला मर्यादित काळाचा ठरू शकतो . विमान फेरी रद्द होणे, तुमचे सामान हरवणे, तत्काल उद्धभणाऱ्या  वैद्यकीय परिस्थितीचा सामना आणि अन्य अनपेक्षित घटनांसाठी प्रवास विमा तुमचे सुरक्षा कवच आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही प्रवास विम्याचे काही लाभ खाली देत आहोत:


१. वैद्यकीय तत्काळ परिस्थिती: प्रवास करताना तुम्ही आजारी पडल्यास किंवा जखमी झाल्यास प्रवास विमा वैद्यकीय खर्चाची भरपाई तुम्हाला मिळवून देतो.


 २. प्रवास रद्द करणे किंवा त्यामध्ये व्यत्यय येणे: जर तुमचा प्रवास रद्द झाला किंवा अनपेक्षित परिस्थितीमुळे व्यत्यय आला, तर प्रवास विमा परत येण्याजोग्या खर्चाची परतफेड तुम्हाला करून देते.


३. हरवलेले किंवा चोरीचे सामान: तुमचे सामान हरवले किंवा चोरीला गेले असेल तर  प्रवास विमा अशा वस्तूंसाठी आर्थिक संरक्षण बहाल करते.


 ४. प्रवासाला विलंब झाल्यास: जर तुमच्या प्रवासाला हवामान, यांत्रिक समस्या किंवा इतर कारणांमुळे उशीर झाला असेल, तर प्रवास विमा तुमच्या निवासाच्या आणि जेवणाच्या अतिरिक्त खर्चासाठी मदत करू शकतो.


 ५. आपत्कालीन निर्वासन: नैसर्गिक आपत्ती किंवा राजकीय अशांततेच्या प्रसंगी, प्रवास विमा तुम्हाला आपत्कालीन निर्वासन कवच देऊ शकतो.


६. सहाय्य सेवा: अनेक प्रवास-विमा धोरणे २४ तास आणि आठवड्यातील सर्व दिवस तुम्हाला  सहाय्य सेवा पुरवतात  जसे की वैद्यकीय संदर्भ पुरवणे किंवा भाषांतर सेवा ज्यामुळे  प्रवास करताना अनपेक्षित परिस्थिती उदभवली तर तुम्हाला याची मदत मिळू शकेल.


 ७. प्रवास विम्यामध्ये गुंतवणूक करूनसुद्धा जर काही अनपेक्षित प्रसंग घडले तर  तुम्ही स्वतःमात्र सुरक्षित आहात हे जाणून मनःशांतीसह तुमच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता.


प्रवास-विमा खरेदी करून, तुम्ही तुमच्या प्रवासाचा आनंद घेण्यावर आणि  नवीन गंतव्यस्थानांवर चिंतामुक्तपणे फिरण्यासाठी मुक्त असू शकता.


एक संपूर्ण विमा संरक्षण जे प्रवाशांना त्यांच्या प्रवासापूर्वी किंवा प्रवासात असताना उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही अनपेक्षित प्रसंगापासून संरक्षण देते त्याला 'प्रवास विमा' असे म्हणतात. तुमचा प्रवास  रद्द होणे, वैद्यकीय संकटे येणे , अपघात होणे , तुमचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले सामान आणि प्रवासातील विविध समस्यांसह संबंधित खर्च आणि तोटा भरून काढण्याचा यामागे उद्देश आहे.

 

'विमा विशिष्ट योजना' आणि 'प्रदाता' यांना निवडून विविध प्रकारचे फायदे मिळावेत म्हणून विमा योजना एकत्रितपणे तयार केली जाऊ शकते.  आजारपण, नैसर्गिक आपत्ती किंवा दहशतवादी कृत्ये यासारख्या अनपेक्षित घटनांमुळे प्रवास रद्द होण्याच्या संरक्षणाचा यात समावेश असू शकतो. प्रवास करताना खर्च केलेल्या वैद्यकीय खर्चाची परतफेड,आपत्कालीन वैद्यकीय निर्वासन,आणि मृत्यू झाल्यास अवशेष परत मिळवणे असे याचे अनेक फायदे आहेत. याशिवाय, प्रवास करताना येणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा सुद्धा या फायद्यांमध्ये समावेश केला जातो.

 

याव्यतिरिक्त, प्रवास-विमा  उत्तरदायित्वांपासून तुमचे संरक्षण करू शकतो. जसे की चुकून तिसऱ्या पक्षाच्या मालमत्तेचे नुकसान होणे किंवा चुकून इतर व्यक्तीला दुखापत होणे. प्रवास विमा हा प्रवास परवाना (पासपोर्ट), प्रवासाची कागदपत्रे किंवा वैयक्तिक मालमत्ता यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचे नुकसान किंवा चोरी याची देखील नुकसान भरपाई मिळवून देऊ शकतो.


शेवटी, प्रवास विमा  खरेदी करणे हा कोणत्याही प्रवासाच्या नियोजन प्रक्रियेचा एक आवश्यक भाग आहे कारण तो आर्थिक सुरक्षितता तसेच प्रवासाशी निगडीत धोके आणि संदिग्धता याच्या सोबतच तुम्हाला  मानसिक आराम मिळवून देतो.


प्रवास विम्याचे फायदे काय आहेत ? आणि अनपेक्षित परिस्थितीत ते कसे तुम्हाला मदत करतात याबद्दल आता आपण जाणून घेऊयात.


 प्रवास विमा तुम्हाला अनेक फायदे प्रदान करतो ज्याने तुम्ही घरापासून दूर असून सुद्धा मनाला  शांत ठेवू शकता. अडचणीच्या काळामध्ये ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी फायद्याचे ठरतात.

Recent Posts

See All
प्रवास-विमा: एक झलक (Travel Insurance: An Overview)

प्रवास म्हणजे स्वप्नपूर्ती, नवीन ठिकाणांचा शोध आणि आनंदाचे क्षण. पण कधी कधी अनपेक्षित घटना घडू शकतात - विमान उड्डाण रद्द होणे, सामान...

 
 
 
प्रवास-विमा: तुमच्या सहलीचा सुरक्षा कवच (Travel Insurance: A Safety Net for Your Trip)

आपण प्रवास करताना आपल्याला सुरक्षितता आणि मनाची शांती हवी असते. आपण कधीही अपघात, आजारपण किंवा इतर अनपेक्षित घटनांचा सामना करू शकतो. अशा...

 
 
 

Comments


bottom of page