तुम्ही प्रवास विमा दाखल ज्या आधाराने दाखल करू शकता अशा अटी व शर्ती
प्रवास विमा रद्द करणे किंवा त्यामध्ये व्यत्यय येणे : एखाद्या अनपेक्षित परिस्थितीत जसे की आजार, दुखापत, कुटुंबातील सदस्याचा मृत्यू किंवा इतर सरंक्षण केलेल्या कारणांमुळे, तुम्ही प्रवास विम्यासाठी दावा करू शकता.
वैद्यकीय तत्काळ परिस्थिती : प्रवास करताना अनपेक्षित आजार किंवा दुखापतीमुळे होणारा वैद्यकीय खर्च प्रवास विम्याद्वारे संरक्षित केले जातात.
प्रवास रद्द होणे किंवा उशीर होणे: तुमचे विमान रद्द झाले किंवा त्याला उशीर झाल्यामुळे तुम्हाला अतिरिक्त खर्च करावा लागत असल्यास तुम्ही दावा करण्यास पात्र आहात.
हरवलेले, चोरीला गेलेले किंवा विलंब झालेले प्रवासाचे सामान: प्रवास-विमा अशा परिस्थितींना संरक्षण देतो आणि हरवलेले, चोरीला गेलेले किंवा विलंब झालेल्या सामानासाठी आवश्यक ती वस्तूंची भरपाई मिळवून देतो.
आपत्कालीन निर्वासन: आपत्कालीन निर्वासनाकरीत खर्चासाठी किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत तुमच्या देशात परत जाण्यासाठी प्रवास विमा तुम्हाला पैसे मिळवून देतात.
अनवधानाने मृत्यू आणि विच्छेदन: प्रवास करताना तुम्हाला अनावधानाने मृत्यू किंवा विच्छेदन झाल्यास प्रवास-विमा त्यासाठी संरक्षण देतो.
इतर अनपेक्षित घटना: प्रवास-विमा अतिरिक्त अनपेक्षित घटनांसाठी संरक्षण देतो.जसे की वैयक्तिक दायित्व, दिवाळखोरी आणि तत्सम घटनांसाठी तुम्हाला संरक्षण मिळवून देतो.
तुमच्या प्रवास-विमा धोरणांच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचणे अतिशय महत्त्वाचे आहे ज्याच्याद्वारे तुम्ही दावा दाखल करू शकता. तसेच प्रत्येक प्रकारच्या दाव्यासाठी आवश्यक सहाय्यक दस्तऐवजांची नेमकी आवश्यकता समजून घेणे आवश्यक आहे. शिवाय, दाव्यांची प्रक्रिया जलदगतीने सुरू करणे आणि अखंड दाव्यांची प्रक्रिया सक्षम करण्यासाठी सर्व आवश्यक दस्तऐवज सादर करणे अत्यावश्यक आहे.
प्रक्रिया:
भारतातील प्रवास-विमा दावा करण्याच्या प्रक्रियेत सामान्यतः खालील गोष्टींचा समावेश असतो:
१. विमा प्रदात्याला सूचित करा: दावा दाखल करावा लागू शकेल अशी घटना घडताच तुम्ही तुमच्या विमा प्रदात्याशी लगेचच संपर्क साधा ज्यामुळे तुमचा दावा दाखल होऊ शकेल. ते तुम्हाला दाव्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतील आणि कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याबद्दल सल्ला देतील.
२. दाव्यासाठीचा अर्ज पूर्ण करा: तुमच्या विमा प्रदात्याने तुम्हाला दिलेला दावा अर्ज हा पूर्ण भरा. घटनेचे तपशील, तुमच्या योजनेचे तपशील आणि आलेला खर्च या सर्व गोष्टी या दिलेल्या अर्जामध्ये व्यवस्थितपणे लिहा.
३. लागणारे कागदपत्रांची जमवाजमव करा: तुम्हाला तुमच्या दाव्याच्या प्रतिपादनासाठी लागणारे आवश्यक असलेले सर्व पुरावे एकत्र करा. वैद्यकीय नोंदी, पोलिस अहवाल (वस्तू चोरी किंवा हरवली असल्यास), जादा खर्चाच्या पावत्या, रद्द केलेल्या प्रवासाचे पुरावे आणि इतर कोणतेही समर्पक दस्तऐवजीकरण यामध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.
४. दावा दाखल करणे: विमा कंपनीच्या सूचनांनुसार पूर्ण केलेला दावा अर्ज आणि कोणतेही आवश्यक ती कागदपत्रे कंपनीला पाठवून द्या. या पूर्ण प्रक्रियेची हमी मिळण्यासाठी तुम्ही कंपनीच्या 'दावा दाखल मार्गदर्शक तत्त्वांचे' पालन करत असल्याची खात्री करा.
५. दाव्याचे पुनरावलोकन आणि मूल्यमापन: विमा कंपनी तुमच्या दाव्याचे परीक्षण करेल, त्यावर आधारित बाबींचे मूल्यमापन करेल आणि मग दावा योजनेमध्ये बसतो आहे की नाही हे ठरवेल.
६. दावा निर्णय: तुमच्या योजनेच्या अटी आणि तुम्ही दाखल केलेल्या माहितीच्या आधारे, विमा कंपनी तुमचा दावा मंजूर करायचा की नाकारायचा हे ठरवेल.
७. दावा स्थापित करणे : घडलेल्या घटनेसाठी जर तुमचा दावा स्वीकारला गेला असेल तर विमा कंपनी त्यानुसार तुम्हाला फायदे मिळवून देईल किंवा तुमच्या झालेल्या योग्य खर्चाची परतफेड करेल.
८. विवाद निराकरण: दाव्यांबद्दलचे विवाद किंवा विमा कंपनीच्या निर्णयाशी असहमत असलेल्या विवादांचे निराकरण करण्यासाठी तुम्ही विमा कंपनीसोबत संपर्क साधून चर्चा करू शकता.
तुम्ही प्रवास विमा योजनेच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये कोणतेही अपवर्जन, सुरक्षा मर्यादा आणि दाव्यांची प्रक्रिया यांचा समावेश आहे. भारतामधे, प्रवास विमा दाव्यांच्या यशस्वी प्रक्रियेसाठी अचूक कागदपत्रे सादर करणे आणि विमा प्रदात्याशी वेळेवर संपर्क ठेवणे आवश्यक आहे.
Comments