प्रवास विम्याचे महत्त्व काय आहे हे सांगेल इतके कमीच ठरेल. मात्र प्रवास विमा उतरवणे पूर्णपणे आवश्यक बाब आहे.
विशेषत: आपल्या देशाबाहेर प्रवास करत असाल तर हा विमा खरेदी करणे गरजेचे आहे. प्रवास करताना उद्धवणारी संभाव्य अनपेक्षित परिस्थिती आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये प्रवास विम्यासाठी आपल्याला भरावा लागणार हप्ता हा होणाऱ्या फायद्याच्या तुलनेत तसा कमी खर्चिक आहे.
तुम्हाला हे ठावूक असेलच की विमा संरक्षण हे तुम्ही खरेदी करत असलेल्या विम्याच्या प्रकारानुसार बदलते आणि काहीवेळा ते तुम्ही ज्या विमाप्रदात्या कंपनीकडून खरेदी करत आहात त्यावरही अवलंबून असते. परंतु सहसा सर्व स्तरांवर अनिवार्य असलेले प्रवास विमा संरक्षण हे समान असते.
प्रवास विम्याबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का की यामध्ये केवळ तुमचा प्रवास सुरू असतानाच्या मुद्द्यांचा समावेश केला जात नाही तर तुम्ही प्रवास सुरू करण्यापूर्वी उद्भवू शकणार्या काही प्रमुख परिस्थितींचाही यामध्ये समावेश होतो.
एकदा का तुम्हाला तुमच्या प्रवासादरम्यान तसेच तुमच्या प्रवासापूर्वी मिळणाऱ्या संरक्षणाचे फायदे समजले की, तुमच्या पुढच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तुम्हाला ते खरेदी करण्यासाठी कोणीही समजून सांगण्याची गरज भासणार नाही.
तुमचा प्रवास सुरू होण्यापूर्वी प्रवास विम्यामधील संरक्षण करणारे मुख्य मुद्दे आम्ही खाली देत आहोत-
प्रवास रद्द करणे किंवा त्यामध्ये व्यत्यय आल्यानंतर मिळणारे संरक्षण- आजारपण, दुखापत, कुटुंबातील सदस्याचा मृत्यू किंवा इतर अनपेक्षित घटना यामुळे तुम्हाला तुमचा प्रवास रद्द करावा लागत असेल किंवा त्यामध्ये व्यत्यय येत असेल तर अशावेळी आवश्यकतेप्रमाणे हे संरक्षण तुम्हाला अगोदरच दिलेले पैसे अथवा आलेल्या खर्चाचा परतावा याची परतफेड मिळवून देवू शकेल.
प्रवासाला विलंब झाला तर- खराब हवामान, सामान्य वाहतुकीमध्ये यांत्रिक बिघाड किंवा इतर संरक्षणाच्या अंतर्गत येणाऱ्या इतर कारणांमुळे तुमच्या विमानाला जर उशीर झाला असेल तर अशावेळी विम्याचे हे संरक्षण विलंबादरम्यान झालेल्या अतिरिक्त खर्चाची परतफेड तुम्हाला मिळवून देईल. यामध्ये राहण्याची सोया, जेवण आणि वाहतुकीची सोया या सारख्या खर्चांचा समावेश असेल.
बऱ्याच प्रवाश्यांचा असा विश्वास आहे की प्रवास विमा संरक्षण हे ज्या दिवसापासून तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत जाण्यासाठी निघता त्या दिवसापासून लागू होते, पण हे खरे नाही. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वीच जर काही वास्तविक,अपरिहार्य आणि गंभीर कारणामुळे जर तुमचा प्रवास रद्द झाला किंवा त्याला उशीर झाला असेल तरीसुद्धा तुम्ही या प्रवास विम्यामुळे संरक्षित आहात.
तुम्ही प्रवास करत असताना प्रवास-विमा मध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो -
वैद्यकीय खर्च आणि आपत्कालीन वैद्यकीय निर्वासन- अनेकदा तुम्ही प्रवास करत असताना अनपेक्षित आजारांमुळे किंवा दुखापतींमुळे झालेल्या वैद्यकीय खर्चाचा समावेश प्रवास विम्यामध्ये होतो. यामध्ये डॉक्टरांच्या तपासणीसाठीच्या भेटी, हॉस्पिटलमध्ये राहावे लागणे, औषधांच्या खर्चाच्या पावत्या आणि अगदी आपत्कालीन वैद्यकीय निर्वासन यांचा समावेश असू शकतो ज्यामुळे तुम्हाला पुरेसे उपचार प्रदान करण्यात सक्षम असलेल्या वैद्यकीय सुविधेपर्यंत पोहचवले जाऊ शकेल.
प्रवासादरम्यान हरवलेले, चोरीला गेलेले किंवा उशीरा पोहचलेले सामान- प्रवास विमा तुमच्या हरवलेल्या, चोरीला गेलेल्या किंवा विलंबाने पोहचलेल्या सामानाकरिता संरक्षण मिळवून देतो. तुमचे सामान गहाळ झाले असेल किंवा ते मिळवायला विलंब होत असेल अशावेळी तुम्हाला आवश्यक असलेल्या अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी या संरक्षणामुळे तुम्हाला या बदल्यात मिळालेली खर्चाची भरपाई फायद्याची ठरेल.
वैयक्तिक उत्तरदायित्व संरक्षण- तुमच्या प्रवासादरम्यान तुमच्याकडून एखाद्याला चुकून दुखापत झाल्यास किंवा त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास, प्रवास विमा अशावेळी कायदेशीर खर्च आणि तृतीय-पक्ष दायित्व दाव्यांशी संबंधित संभाव्य तोडग्यांसाठी संरक्षण प्रदान करू शकते.
अपघाती मृत्यू आणि अपंगत्वासाठी संरक्षण: प्रवास करताना अपघाती मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास, प्रवास विमा तुम्ही नियुक्त केलेल्या लाभार्थ्यांना किंवा तुम्हाला (अपंगत्व आले असेल तर) लाभाचे मिळणारे पैसे देऊ शकेल.तुम्हाला या कठीण काळात काही प्रमाणात का होईना आर्थिक दिलासा मिळेल.
प्रवासासाठीचे कागदपत्रे आणि प्रवास परवान्यांचे (पासपोर्ट) नुकसान : तुमचा पासपोर्ट किंवा व्हिसा यांसारखे महत्त्वाचे प्रवासी दस्तऐवज जर तुमच्याकडून हरवले असतील तर प्रवास-विमा यासंदर्भातील पर्यायी व्यवस्था आणि संबंधित प्रवास विलंबाशी संबंधित येणाऱ्या खर्चासाठी सहाय्य आणि संरक्षण प्रदान करेल.
नेहमीप्रमाणे,तुमच्यासाठी उपलब्ध असलेले प्रवास-विमा संरक्षणाचे पर्याय आणि योजनांच्या तपशीलांचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा आणि विमा प्रदात्याशी किंवा जाणकार विमा व्यावसायिकाशी सल्लामसलत करा. तुमच्या विशिष्ट प्रवास योजना आणि परिस्थितींसाठी उपलब्ध असलेले हे पर्याय लागू आहेत कि नाही, हे तुम्हाला पूर्णपणे समजले असल्याची खात्री करा.
आपण हे लक्षात घेऊयात की प्रवास विमा योजना या संरक्षण आणि शर्तींच्या बाबतीत अतिशय वेगवेगळ्या असू शकतात. योजनेची कागदपत्रे काळजीपूर्वक वाचणे आणि अटी, मर्यादा, अपवाद असलेल्या अटी आणि गरज भासल्यास दावा कसा करायचा या सगळ्या बाबी समजून घेणे महत्त्वाचे आहे. विमा संरक्षणाबाबत तुम्हाला काही विशिष्ट शंका किंवा प्रश्न असल्यास, विमा प्रदात्याशी थेट संपर्क साधा किंवा एखाद्या अनुभवी विमा व्यावसायिकाचा सल्ला घ्या.
त्यामुळे तुम्ही तुमच्या पुढील आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियोजन करत असाल तर अचूक संशोधन करत असताना तुमच्यासाठी योग्य प्रवास विमा शोधायला आणि तो खरेदी करायला विसरू नका!
Comments