तुम्ही प्रवास करण्यास उत्सुक तर आहात पण तुम्हाला प्रवास विम्याबद्दल काय माहिती आहे? प्रवासी नहेमी विमा सरंक्षण आणि हप्त्याच्या मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतात हे आम्ही आमच्या अनुभवातून सांगत आहोत. परंतु प्रवास विम्यावरील तुमचा झालेला खर्च हा एक योग्य खर्च आहे याची तुम्हाला खात्री करायची असेल तर तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती असायला हवी.
प्रवास विम्याचे विविध प्रकार आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? जास्तीत जास्त किमंत आणि विमा संरक्षण मिळविण्यासाठी स्वतःसाठी योग्य प्रकारचा विमा निवडणे अत्यावश्यक आहे. येथे प्रवास विम्याचे काही सामान्य प्रकार दिले आहेत, याबद्दल प्रत्येक प्रवाशाला माहिती असायला हवी -
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास विम्याकरिता उपलब्ध पर्याय
प्रवास-विमा योजना या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमा सरंक्षण या प्रकारात वर्गीकृत केल्या जातात. आंतरराष्ट्रीय प्रवास विमा परदेशात जाण्यासाठीच्या प्रवासाला लागू होतो, तर देशांतर्गत प्रवास विमा देशांतर्गत प्रवासाला लागू आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास विम्यामध्ये योजना या ते सरंक्षण करत असलेल्या विशिष्ट देशांच्या आधारावर बदलू शकतात. काही योजना विशिष्ट देश किंवा प्रदेशांना सरंक्षण करण्यासाठी तयार केल्या आहेत, तर काही योजना अपवाद वगळता सर्व देशांसाठी प्रवास विमा सरंक्षण मिळवून देतात. या व्यतिरिक्त, काही सर्वसमावेशक योजना सुद्धा आहेत ज्या कोणत्याही अपवादाशिवाय कोणत्याही देशाच्या प्रवासासाठी प्रवास विमा सरंक्षण मिळवून देतात.
एकेरी प्रवास आणि अनेकवेळा प्रवास फेरी यासाठी प्रवास-विमा योजनेचे विविध पर्याय-
एकेरी प्रवास-विमा योजना या एकाच प्रवासासाठी आखल्या गेल्या आहेत आणि योजनेमध्ये स्पष्टपणे नमूद केल्यानुसार त्या ठराविक दिवसांकरिताच प्रवास विमा सरंक्षण मिळवून देतात. यामधील संरक्षण सामान्यत: निर्गमन तारखेपासून सुरू होते आणि परतीच्या तारखेपर्यंत ते वैध आहे. याउलट अनेक प्रवासांसाठी निवडलेली विमा योजना हि योजनेच्या प्रारंभ तारखेपासून एका वर्षाच्या कालावधीत अनेक सहलींसाठी प्रवास विमा संरक्षण मिळवून देते. हि योजना वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी एकदम योग्य आहे.जे प्रवासी वर्षभर अनेकवेळा प्रवास करतात त्यांच्यासाठी हि योजना सोयीची आणि किफायतशीर ठरणार आहे.
वैयक्तिक आणि समूहासाठी प्रवास विम्याचे वैकल्पिक पर्याय -
वैयक्तिक प्रवास विमा योजना एकट्या प्रवाश्यासाठी किंवा त्याच्या कुटुंबियांसोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी आहेत. जर योजना खरेदी करताना त्यांची नावे स्पष्टपणे नमूद केली गेली असतील तर या योजमध्ये योजनाधारक आणि त्याचसोबत प्रवासाला आलेल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना संरक्षण दिले जाते.
याउलट, समूहासाठी प्रवास विमा योजना या अशा कंपन्यांसाठी निर्माण केल्या गेल्या आहेत ज्यांचे कर्मचारी व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करत असतात. प्रवासाच्या योजनेचा भाग म्हणून एकत्र प्रवास करणाऱ्या व्यक्तींना प्रवास विमा सरंक्षण देण्यासाठी प्रवास नियोजन आखणारे आयोजक हे सहसा समूह प्रवास विमा खरेदी करतात. प्रवास योजनेच्या नियोजनांमध्ये या प्रकारचा विमा वारंवार समाविष्ट केला जातो.
विद्यार्थ्यांसाठी प्रवास विमा धोरणे -
कोविड-१९ या साथीच्या रोगाचा विद्यार्थ्यांवर, विशेषत: परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम झाला होता. अशा परिस्थितीत विद्यार्थी प्रवास विमा योजना या बहुमोल कामगिरी बजावतात. ते केवळ वैद्यकीय खर्चांना संरक्षण देत नाहीत. काही वेळा परदेशात शिकत असताना विद्यार्थ्याच्या मर्यादित संसाधनांवर ताण येऊ शकतो .कायदेशीर कारणांमुळे योजनाधारकाच्या शिक्षणात व्यत्यय आला तर परीक्षा शुल्काची परतफेड देखील अशावेळी केली जाते. याशिवाय, या योजना प्रवास रद्द करण्यासाठीसुद्धा प्रवास विमा सरंक्षण देतात.
विम्याच्या प्रकारांप्रमाणेच, तुम्हाला अतिरिक्त प्रवास विमा संरक्षणाचे महत्त्वाचे पैलू काय आहेत हे माहित असणे देखील आवश्यक आहे. विमा प्रदाता कंपनी कोणतीही असो सामान्यतः सामान्य प्रवास विमा योजनेत विशिष्ट संख्या असलेलेच संरक्षण दिले जाईल. हे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या खर्चाच्या शक्यतांपासून तुम्हाला संरक्षण मिळवून देईल.तरीही काही अतिरिक्त सरंक्षण मिळवून देणारे पर्याय आहेत ज्यासाठी तुम्ही विचारणा करू शकता. तुमची वैद्यकीय पाश्वर्भूमी आणि तुमच्या प्रवासाचे स्वरूप यावर आधारित, तुमच्या प्रवास विमा योजनेत योग्य संरक्षणाचा पर्याय निवडणे तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे.तुम्ही ज्या देशात प्रवास करत आहात यावर हे अवलंबून असणार आहे .
साहसी किंवा धाडसी खेळांसाठी संरक्षण- जर तुम्ही स्कायडायव्हिंग, बंजी जंपिंग किंवा स्कूबा डायव्हिंगसारख्या साहसी किंवा यासारख्या धाडसी क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्याची योजना आखत असाल, तर तुम्हाला या क्रियाकलापांसाठी स्वतंत्रपणे सरंक्षण मिळवून देणारी योजना मिळवण्यासाठी विचारणा करावी लागेल.नियमित प्रवास विमा योजनांमध्ये अनेकदा उच्च-जोखीम असलेल्या खेळांना वगळले जाते.म्हणूनच अशावेळी विशिष्ट संरक्षणाची गरज तुम्हाला भासू शकते.
पूर्व-अस्तित्वात असलेली वैद्यकीय परिस्थिती: काही प्रवासी विमा योजना आधीपासून मूलतः अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय परिस्थितींना संरक्षण देत नाहीत. तुमची पूर्व-अस्तित्वात असलेली वैद्यकीय स्थिती असेल तर तुमच्या प्रवासादरम्यान कोणत्याही संबंधित वैद्यकीय आणीबाणीच्या बाबतीत तुम्ही संरक्षित आहात याची खात्री करण्यासाठी तुम्हाला खास किंवा विशेष संरक्षण मिळवण्यासाठी यासंदर्भातील विचारणा करण्याची आवश्यकता तुम्हाला भासू शकते.
कोणत्याही कारणास्तव प्रवास रद्द करण्यासाठी संरक्षण (सी एफ ए आर): बर्याच प्रमाणित प्रवास विमा योजनांमध्ये प्रवास रद्द करण्याची विशिष्ट कारणे असतात. पाहायचं झालं तर आजारपण किंवा कौटुंबिक आपत्कालीन परिस्थिती यासारखी करणे आहेत. तुम्हाला कोणत्याही कारणास्तव तुमचा प्रवास रद्द करण्याची मुभा हवी असेल तर तुम्हाला सी एफ ए आर ऍड-ऑन खरेदी करणे गरजेचे आहे. जे तुम्हाला प्रमाणित योजनेमध्ये सूचीबद्ध नसून सुद्धा तुमच्या प्रवासाच्या खर्चाची टक्केवारी तुम्हाला परत मिळवून देते.
जास्त किमतींच्या वस्तूंसाठी संरक्षण: नेहमीच्या प्रवास विमा योजनांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, दागिने आणि महागडे कॅमेरा उपकरणे यासारख्या वैयक्तिक वस्तूंसाठी मिळणाऱ्या संरक्षणावर मर्यादा असतात. तुम्ही या मर्यादा ओलांडणाऱ्या जास्त किमतींच्या वस्तूंसह प्रवास करणार असाल तर तुम्हाला अतिरिक्त विमा संरक्षणाची विनंती करावी लागेल किंवा या वस्तुंना संरक्षण मिळवून देणारी स्वतंत्र योजना तुम्हाला खरेदी करावी लागेल.
तुमच्या प्रवास विमा योजनेच्या अटी आणि शर्तींचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करणे आणि तुमच्या विशिष्ट गरजांविषयी विमा प्रदात्याशी सल्लामसलत करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्हाला तुमच्या विशिष्ट प्रवास योजना आणि परिस्थितीसाठी आवश्यक त्या प्रमाणात विमा संरक्षण मिळू शकेल.
त्यामुळे, जर तुम्ही आगामी काळात प्रवासाची योजना आखत असाल तर तुम्ही प्रवास विमा योजना अंतिम करण्यापूर्वी या विविध मुद्द्यांचा विचार करायला विसरू नका.तुमच्यासाठी प्रवास विम्यासंदर्भातील हीच माहिती आहे जी तुम्हाला सांगणे महत्वाचे आहे असेल आम्हाला वाटते. ही माहिती जाणून घेतल्याने तुम्हाला स्वत:साठी योग्य प्रवास विमा योजना निवडण्यास, तुमच्या प्रवासादरम्यान जास्तीत जास्त संरक्षण सुनिश्चित करण्यास आणि तुमच्या हप्त्यांमध्ये बचत करण्यास तुम्हाला मदत करेल!
Comentários