जर तुम्ही सुट्टीवर जाण्याचे तयारी करत असाल तर तुमच्याकडे प्रवास विमा असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रवास विमा कुठल्याही अनपेक्षितपणे घडणाऱ्या प्रसंगातून तुमचे संरक्षण करतो. BTW Visa Services विम्यासाठी सर्व-समावेशक योजना प्रदान करते ज्यामध्ये वैद्यकीय अडचणीचे प्रसंग, प्रवास रद्द होणे, हरवलेले किंवा चोरीला गेलेले सामान आणि इतर अनेक संभाव्य समस्या यासारख्या विविध अकस्मित घडणाऱ्या गोष्टींचा समावेश आहे.
आमच्या योजना या रास्त किमतीत आणि ग्राहकांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत साजेश्या आहेत. यामुळेच आम्ही तुम्हाला खात्री देऊ शकतो की तुम्ही कसलीही काळजी न करता तुमच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकाल. तुमच्या सुट्टीच्या पुढील नियोजनात तुम्हाला मदत करण्यासाठी आणि तुम्हाला काळजीमुक्त आनंद घेता यावा याकरिता तुम्ही आमच्यावर बिनधास्त विश्वास ठेवू शकता.
सर्व प्रथमतः
प्रवासाला जाणे हे एक उत्साहवर्धक साहस असू शकते, परंतु काही वेळा यामध्ये निश्चित प्रमाणात अडथळे सुद्धा येऊ शकतात.विश्वासार्ह प्रवास विमा कव्हरेज हे अनपेक्षित वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी, तसेच हवाईप्रवास रद्द होणे आणि चुकीच्या ठिकाणी ठेवले गेलेले सामान अशा प्रस्थितीमध्ये प्रवास विमा तुमच्या सुरक्षा कवचाचे काम करेल. आजकाल प्रवास विमा प्रदान करणाऱ्या बर्याच वेगवेगळ्या कंपन्या आहेत पण यातील एकाच योग्य कंपनीची निवड करणे हे कदाचित तुम्हाला अवघड वाटेल . तुमच्या पुढील प्रवासाबाबत उचित निवड करण्यामध्ये तुम्हाला मदत करण्याच्या ध्येयाने या ब्लॉगमध्ये आम्ही २०२३ मधील सर्वोच्च प्रवास विमा प्रदात्यांबद्दल माहिती देणार आहोत.
मूल्यमापन घटक म्हणून आपण खालील गोष्टींचा विचार करूयात :
खरतर सर्वोत्कृष्ट प्रवास-विमा प्रदात्यांच्या यादीत आमच्या कर्मवारीचा शोध घेण्यापूर्वी, आम्ही वापरत असलेल्या मूल्यांकन निकषांची माहिती सर्वात आधी तुम्हाला ठाउक असणे महत्वाचे आहे. हे घटक खालीलप्रमाणे आहेत.
१. 'सरंक्षण' (कव्हरेज) पर्याय हा कंपनीमार्फत प्रदान केलेली संरक्षणाची श्रेणी आहे. ज्यामध्ये प्रवास रद्द करणे, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, हरवलेले सामान आणि इतर अडचणींसाठी सरंक्षण यांचा समावेश असू शकेल.
२.ग्राहक पुनरावलोकने म्हणजे कंपनी मार्फत प्रदान केलेल्या सेवांचा वापर ज्यांनी केला आहे अशा ग्राहकांची मते आणि अभिप्राय आहेत .
३. किंमतीमध्ये समाविष्ट असलेल्या सरंक्षणाच्या प्रमाणात खिशाला परवडणारी आणि रास्त किंमत याचा यामध्ये समावेश आहे.
४. ज्या सुलभतेने आणि गतीने दावे दाखल केले जाऊ शकतात आणि त्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते त्याला "दावे प्रक्रिया" असे म्हटले जाते.
५. ग्राहक सेवा: कंपनीचे ग्राहक सहाय्य प्रतिनिधी ज्या प्रमाणात मदतीस तयार आहेत आणि ग्राहकांना प्रतिसाद देत असतात त्याला ग्राहक सेवा असे म्हणतात.
यावर आम्ही आमचे हे निकष स्थापित केले आहेत.चलातर शोधुयात कोणत्या कंपन्या सर्वोत्तम प्रवास विमा तुम्हाला देऊ शकतात.
१. अलिअंज ग्लोबल असिसटन्स आहे. ( Allianz Global Assistance)
ग्राहकांना प्रदान केलेल्या कव्हरेज पर्यायांच्या विस्तृत श्रेणींमुळे प्रवासी विमा व्यवसायातील अग्रगण्य कंपनी म्हणून Allianz ची ओळख आहे. ते एका प्रवाश्यापासून ते कुटुंबांपर्यंत अशा विविध प्रकारच्या पर्यटकांच्या गरजेनुसार तयार केलेले विविध पर्याय तुम्हाला देतात. Allianz च्या ग्राहक सेवा प्रतिनिधींचा प्रतिसाद आणि ते ज्या सहजतेने दावे हाताळतात त्यामुळे कंपनीने सर्वोच्च स्थान मिळाले आहे.
२. ए. आय. जी. (AIG) मार्फत दिली जाणारी प्रवास-विमा सुरक्षा, :
प्रवास विमा क्षेत्रातील आणखी एक प्रसिद्ध आणि नामवंत नाव म्हणजे ट्रॅव्हल गार्ड. ते तुम्हाला धोरणांविषयी विविध निवडी देतात. त्यापैकी काही जास्त जोखमीच्या घटना आणि स्थाने असतील त्याचबरोबर धाडसासंबंधित उपक्रमांना सुद्धा ते सरंक्षण मिळवून देतात. ही सेवा रास्त किमतीत उपलब्ध आहे आणि एक सुव्यवस्थित दाव्यांची प्रक्रिया प्रणाली आहे म्हणून ग्राहक ट्रॅव्हल गार्ड निवडतात
३. वर्ल्ड नोमॅड्स: (World Nomads)
वर्ल्ड नोमॅड्स हे साहसी वृत्ती असलेल्या पर्यटकांसाठी व डिजिटल नोमॅड्स करिता उपलब्ध आहेत.प्रवास सुरु करूनसुद्धा ते अनुकूल सरंक्षण तुम्हाला मिळवून देतात आणि ते कोणत्याही वेळी मिळवले जावू शकते. जगाच्या पाठीवर प्रवास करणाऱ्या यात्रेकरुंप्रती त्यांचे नैतिक समर्पण व ऑनलाइन खरेदी प्रक्रियेदरम्यान त्यांचा असणारा मोकळेपणा आणि वापर यामुळे वर्ल्ड नोमॅड्सला विशेष ओळख मिळाली आहे. ते ज्या सहजतेने या सर्व बाबी हाताळतात याचमुळे कंपनीला सर्वोच्च क्रमवारीत स्थान मिळाले आहे.
४. ट्रॅव्हलेक्स विमा: (Travelex Insurance)
ट्रॅव्हलेक्स विमा ग्राहकांना त्यांचे धोरण निवडण्याची आणि सरंक्षण संदर्भातील निवडीचा पर्याय देते. ते कमी दर व जे कोणत्याही कारणास्तव रद्द केले जाऊ शकतात अशा कव्हरेजला पर्याय म्हणून प्रसिद्ध आहेत . नियमित उड्डाण करणाऱ्या प्रवाश्याना मिळणाऱ्या 'चलन विनिमय सेवा' यामुळे ट्रॅव्हलेक्स विमा विशेष प्रसिद्ध आहे .
५. इन्शुर माय ट्रीप (Insure My Trip) :
"Insure My Trip" नावाने ओळखल्या जाणार्या तुलनात्मक संकेतस्थळाचा वापर करून तुम्ही विविध प्रवासी विमा कंपन्यांच्या योजनांची तुलना करू शकता. यामुळे तुमच्या वैयक्तिक गरजांसाठी तसेच तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी सर्वात योग्य विमा योजना शोधणे सोपे झाले आहे. त्यांचे संकेतस्थळ हे वापरयाला सोपे आहे आणि या संकेतस्थळाकडे मागील ग्राहकांपासून मिळेल महत्वपूर्ण अभिप्राय देखील आहे.
प्रवास-विमा प्रदाता निवडताना विचारात घेण्याच्या अंतर्गत, सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्या वैयक्तिक गरजा आणि प्राधान्ये.आम्ही तुमच्या प्रत्येक संभाव्यतेच्या संपूर्ण अभ्यास करतो आणि तुमच्यासाठी योग्य विशिष्ट संरक्षणाचा विचार करून तुम्हाला आगामी प्रवासासाठी आमच्या मदतीची आवश्यकता आहे हे जाणतो.तुम्हाला तुमचा वेळ समुद्रकिनाऱ्यावर आरामात घालवायचा आहे किंवा एखाद्या रोमांचक साहसासाठी तुम्हाला जायचे आहे याची पर्वा न करता, योग्य प्रवास विमा तुम्हाला तुमच्या संपूर्ण प्रवासात मनःशांती देऊ शकतो.
तुम्ही घरापासून दूर असताना प्रवास विमा उतरवणे हे तुमच्या शारीरिक आणि आर्थिक आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक आहे हे लक्षात ठेवा. निवडीचा निर्णय घेण्यापूर्वी, पॉलिसीच्या अटी व शर्ती नीट वाचल्या जाव्यात, त्या संर्भातील प्रश्न विचारले जावेत आणि ती व्याप्ती समजत असल्याची आपण खात्री करून घ्या अशी आग्रहाची शिफारस आम्ही तुम्हाला करतो. तुमचा प्रवास सुखद होवो.
ความคิดเห็น